DFSL Maharashtra Forensic Bharti 2024 : न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती ! 10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी ..
DFSL Maharashtra Forensic Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. मित्रांनो तेव्हा ऑनलाईन अर्ज करत असताना 27 फेब्रुवारी 2024 शेवटची तारीख आहे. मित्रांनो या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात.
मित्रांनो या भरती बाबतची माहिती आपण या mahajob18.com जाहिरातीमध्ये बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो खाली दिलेली सर्व माहिती उमेदवारांनी पाहणे आवश्यक आहे.
DFSL Maharashtra Forensic Bharti 2024 Marathi Details
DFSL Maharashtra Forensic Bharti मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासन गृह विभाग गट क या पदासाठी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. मधील दिलेल्या निर्देशानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे, आणि सोलापूर प्रयोगशाळेतील गट क या संवर्गातील सरळ सेवेतील खालील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Educational Qualification For DFSL Maharashtra Forensic Bharti 2024
*पदसंख्या :- DFSL Maharashtra Forensic Bharti 2024
1.वैज्ञानिक सहाय्यक (गट क )
Scientific Assistant
एकूण पदसंख्या 54
-आवश्यक शिक्षण पात्रता :-
विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
किंवा
न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण.
मासिक वेतन : – (35,400-112400) रुपये ते एक लाख बारा हजार चारशे रुपये. अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार इतर भत्ते
2.वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे. ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण) (गट क) Scientific Assistant (Cyber Crime. Tape Authentication Speaker Identification)
एकूण पदसंख्या :- 15
शैक्षणिक पात्रता : – DFSL Maharashtra Forensic Bharti 2024
विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहाय्यक विज्ञान या विषयातील किमान दुतीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
किंवा
(Post Graduate Diploma In Digital and Cyber Forensic and Related Law.)
मासिक वेतन : (35,400 – 1,12400) अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार इतर भत्ते.
3.वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क)
Scientific Assistant (Psychology)
एकूण पदे : 2
शैक्षणिक पात्रता :
मानसशास्त्र विषयातील किमान दुतीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समक्ष म्हणून घोषित केलेली अन्य अहर्ता.
मासिक वेतन : (35,400 – 1,12400) अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय इतर भत्ते
4.वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) Senior Laboratory Assistant.
एकूण पदे :- 30
शिक्षण पात्रता :- DFSL Maharashtra Forensic Bharti 2024
विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच एस सी सायन्स परीक्षा उत्तीर्ण.
(H.S.C) Science
मासिक वेतन : (25,500 – 81,100) अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार इतर भत्ते
5.वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) Senior Clerk (Stores)
एकूण पदे : 05
शिक्षण पात्रता :
विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC Science) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक वेतन : (25,500 – 81 ,100) अधिक महागाई भत्ता व इतर शासन नियमानुसार इतर भत्ते.
6.कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) Junior Laboratory Assistant
एकूण पदे : 18
शिक्षण पात्रता : DFSL Maharashtra Forensic Bharti 2024
विज्ञान विषयासह माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र
(SSC with Science) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक वेतन : (21,700 – 69,100) अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय इतर भत्ते.
7. व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) Manager (Canteen)
एकूण पदे : 01
शिक्षण पात्रता :- DFSL Maharashtra Bharti 2024
माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण आणि नंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान 03 वर्षाचा अनुभव आवश्यक. आणि तसेच शासन मान्यता प्राप्त कोणत्याही केटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवारला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल.
*वयाची अट : Age Limit For DFSL Maharashtra Bharti 2024
18 ते 38 वर्ष (SC/ST :- 18 ते 43 वर्ष)
*नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क : Examination Fee DFSL Maharashtra Bharti 2024
एकूण जागा : 125 जागा
-खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रुपये 1000/-
-मागासवर्गीय /अनाथ, दिव्यांग, प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रुपये 900/-
-माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
-मित्रांनो उमेदवारांना परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील GST लागणार.
*पदाचे नाव आणि तपशील
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात :– दिनांक 06/ 02/ 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : – दिनांक 27/02/2024
*निवड प्रक्रिया :- आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती (सर्व उमेदवारांसाठी)
Important Documents For DFSL Maharashtra Forensic Bharti 2024
-उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
-वरील सर्व पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
-उमेदवारांकडे जर डोमासाईल नसेल तर त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला सादर करणे आवश्यक आहे.
-अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. सदर उमेदवाराकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्मतारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास त्या उमेदवाराने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतु सदर शाळा सोडल्याचा दाखला मध्ये त्या उमेदवाराचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे. या प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही.
-ज्या उमेदवारांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतु महाराष्ट्र राज्यातील रहिवास सलग 15 वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशा उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यक राहील.
-आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडीटी सर्टिफिकेट निवडी अंती सादर करणे आवश्यक आहे.
-नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास वित्त विभाग ,शासन निर्णय नुसार दिनांक 31 ऑक्टोबर 2005 नुसार लागू करण्यात आलेली नवीन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना (New Defined Contributory Pension Scheme) लागू राहील. त्यांना महाराष्ट्र नागरी (सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराकरण) नियम 1984 आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही तथापि सदर नियमात भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील.
*मित्रांनो परीक्षेचे स्वरूप थोडक्यात दिलेले आहे.
DFSL Maharashtra Forensic Bharti 2024, DFSL Maharashtra Bharti 2024
-वरील सर्व सात पदाकरिता लेखी परीक्षा एकूण प्रश्न 100 असणार आहेत. आणि एकूण गुण 200
*परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. मित्रांनो प्रश्नपत्रिका तील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील.
टीप :- वर दिलेल्या पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
-या भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
-या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा