Lek Ladki Yojana 2024 ! लेक लाडकी योजना 2024 ; मुलींना मिळणार 1लाख रुपये !असा करा अर्ज..
Lek Ladki Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात लेक लाडकी योजना याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. त्यामुळे कृपया करून सर्वांनी हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. व या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तसेच तुमच्या परिसरातील असे कोणी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे असतील ज्यांना मुली आहेत तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेअर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवून स्वतःच्या मुलीसह शिक्षण पूर्ण करू शकतील धन्यवाद.
Lek Ladki Yojana Information in Marathi
Lek Ladki Yojana 2024 : चला तर मग आपण जाणून घेऊयात लेक लाडकी योजना संदर्भातील सविस्तर माहिती. मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर घसरत चालल्याने शासनाने मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून 2017 यावर्षी माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली होती. परंतु या योजनेची अंमलबजावणी पाहिजे तशी न झाल्याने परत शासनाने हीच योजना नव्या नावाने सुरू केली जिचे नाव आहे लेक लाडकी योजना.
मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या तसेच गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून तिचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत तिच्या शिक्षणासाठी एकूण एक लाख एक हजार (1,01,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्यक 5 टप्प्यात करण्यात येणार आहे. जे तिच्या वयानुसार आणि शिक्षणानुसार वेगवेगळे असेल.
लेक लाडकी योजना त्या मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे एक महत्त्वकांक्षी अशी योजना आहे ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील जन्मलेल्या मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
Lek Ladki Yojana 2024 : तसेच वाचकांना महत्त्वाची सूचना : आम्ही लेक लाडकी योजना याची माहिती या लेखात दिली आहे. त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरातील असे कोणी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे असतील ज्यांना मुली आहेत तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेअर करा जेणेकरून ते योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवून स्वतःच्या मुलीसह शिक्षण पूर्ण करू शकतील.
योजनेचे नाव आणि लाभार्थी
- योजनेचे नाव : Lek Ladki Yojana Information In Marathi
- उद्देश : मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
- एकूण लाभ : एक लाख एक हजार रुपये आर्थिक सहाय्य (1,01,000/-रुपये)
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन/ऑनलाईन
Lek Ladki Yojana 2024 in Marathi Details
लेक लाडकी या योजनेचे मूळ उद्देश म्हणजे
- शिक्षणामध्ये मुलींना आर्थिक वाव देणे
- मुलींचा जन्मदर वाढवणे
- मुलींचा होत असलेला मृत्यू दर कमी करणे
- शाळेत न जाणाऱ्या मुलींचे प्रमाण 0% वर आणणे
- राज्यातील मुलीचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
- गरीब कुटुंबांना आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
- राज्यातील मुलींचा सर्वांगीण विकास करणे
- पैशा पासून अभावी गरीब कुटुंबातील मुली शिक्षणाशिवाय वंचित राहू नये.
- मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देण्यावर चालना देणे.
- कमी वयातील मुलींचा बालविवाह रोखणे.
- मुलींचे कुपोषण कमी करणे.
लेक लाडकी योजना पाच टप्प्यांमध्ये खालील प्रमाणे मिळेल लाभ
*मित्रांनो ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड आहे त्या कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे. Lek Ladki Yojana 2024
- शासनाकडून जे तुम्हाला अनुदान मिळणार आहे ते खालील प्रमाणे असणार आहे.
1) जेव्हा मुलीचा जन्म होईल त्यावेळी सुरुवातीला 05 हजार रुपये मिळतील.
2) मुलगी जेव्हा ईयत्ता 1 ली मध्ये शिक्षण साठी जाईल त्यावेळी 06 हजार रुपये मिळतील.
3) इयत्ता सहावी 06 मध्ये 07 हजार रुपये मिळतील. Lek Ladki Yojana 2024
4) मुलगी जेव्हा येता अकरावी 11 वी मध्ये जाईल त्यावेळी आठ 08 हजार रुपये मिळतील.
5) सर्वात शेवटी म्हणजे मुलीचे वय जेव्हा अठरा 18 वर्षे पूर्ण होईल त्यावेळी 75 हजार रुपये अनुदान मिळेल.
6) अशाप्रकारे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम लेक लाडकी योजना अंतर्गत जे लाभार्थी असतील त्यांना दिली जाणार आहे.
लेक लाडकी योजना ची काही वैशिष्ट्य
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास तसेच त्यांचा सामाजिक विकास होण्यास तसेच ते शिक्षणासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनण्यासाठी लेक लाडकी योजना महत्त्वाची ठरणार आहे.
- या योजनेचे अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे गरीब कुटुंबाला अर्ज करताना कुठल्याच अडचणींचा सामना करावा लागणार नाही. Lek Ladki Yojana 2024
- तसेच या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार टाळला जाईल.
- या योजनेअंतर्गत मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल व तसेच तो उंचावण्यास देखील मदत होईल.
लेक लाडकी योजना याचा लाभ कोणाला मिळेल
1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना या लेक माझी लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रंगाचे राशन कार्ड असणे आवश्यक.
जर दोन अपत्य झाली उदाहरणार्थ एक मुलगा व एक मुलगी असेल तर मुलीशी या योजनेचा लाभ दिला जाईल.
मित्रांनो पहिले जे आपत्ती होईल त्या आपत्याच्या तिसऱ्या व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असणार आहे.
लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. Lek Ladki Yojana 2024
पहिले आपत्य असेल आणि त्यानंतर जुळी मुली झाल्यास त्यांना सुद्धा मिळणार लाभ त्यानंतर मात्र माता इतिहास कुटुंब नियोजन करणे गरजेचे असणार आहे.
अर्जदार मुलींचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांनाचे आयोजनाचा लाभ दिला जाईल.
महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी सेवेत कार्यरत असता कामा नये.
लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलीला स्वतःचे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे त्यामुळे जर मुलीने एखाद्या कारणात व शिक्षण सोडले तर अशा परिस्थितीत तिला लाभाची राशी दिली जाणार नाही.
लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
Lek Ladki Yojana 2024 documents
लेक लाडकी या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- मुलीचा जन्माचा दाखला
- सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला
- अर्जदार मुलीचे आधार कार्ड
- पालकाचे आधार कार्ड
- बँकेच्या पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- राशन कार्ड पिवळे अथवा केसरी राशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मतदार ओळखपत्र शेवटच्या लाभारकरिता अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला
- संबंधित टप्प्यावरील लाभा करिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafide)
- अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र)
- मोबाईल नंबर
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज सादर करून द्या पुढे अंगणवाडी सेविका हा अर्ज ऑनलाईन करून घेतील.
अशाप्रकारे तुम्ही लेक लाडकी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Lek Ladki Yojana अंतर्गत काही महत्त्वाच्या गोष्टी
सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी एक 01 एप्रिल 2023 रोजी व मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागद दापत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
सदर परिशिष्टामध्ये आवश्यकतेनुसार काही सुधारणा करणे गरजेचे असल्यास त्याबाबत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्यामार्फत त्यांचा स्तरावरून सुधारणा केली जाईल. सदर योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा, कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला, बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.
अंगणवाडी सेविका संबंधित लाभार्थ्याकडून अर्ज भरून घेतील. गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत केली जाईल आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका /मुख्य सेविका यांच्याकडे सादर करावा. Lek Ladki Yojana 2024
अंगणवाडी पर्यवेक्षिका/मुख्य सेविका सदर अर्जाची व प्रमाणपत्रांची सर्व तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थेमधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांना तर मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्राच्या बाबतीत नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करतील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद/नोडल अधिकारी हे योग्य ती छाननी करून यादीस मान्यता देऊन आयुक्तालयात सादर करतील. अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करताना महिला व बालविकास विभागाच्या सक्षम प्राधिकार्यांकडून देण्यात आलेले अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रमाधिकारी जिल्हा परिषद हे याचिक पद्धतीने जास्त संख्येने अर्ज प्राप्त झालेल्या एखाद्या क्षेत्राची तपासणी करतील व त्यांची खात्री झाल्यानंतर लाभार्थी यादीला मान्यता देतील.
पर्यवेक्षिका/बाल विकास प्रकल्प अधिकारी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह सादर केलेला नसल्यास असा अर्ज मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत पुर्तता करण्याकरिता अर्जदार असले की कळवले जाईल.
त्याप्रमाणे अर्जदाराने एका महिन्यात कागदपत्रांच्या पूर्वीचे सह अर्ज दाखल करावा. काही अपरिहार्य कारणात स्व अर्जदार या मुदतीत अर्ज दाखल करू शकला नाही तर त्यास वाढीव दहा दिवसांची मुदत देण्यात येईल. अशाप्रकारे कमाल दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सदरच्या अर्जावर कारवाही पूर्ण केली जाईल.
Lek Ladki Yojna 2024 In Marathi
1.फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे.
लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका त पर्यवेक्षिका मुख्य /सेविका करतील तसेच लाभार्थ्यांचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करतील.
2.अंगणवाडी सेविका /पर्यवेक्षिका/ मुख्य सेविका
लेक लाडकी योजनेचा लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका संबंधित पर्यवेक्षिका/ मुख्य सेविका यांची राहील.
अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका/ मुख्य सेविका /हे लाभार्थी पात्रतेची खात्री जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करतील. सक्षम अधिकारी हे या कामकाजावर नियंत्रण ठेवतील.
त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका/ मुख्य सेविका/ व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार आयुक्तालय स्तरावरून सुधारणा करण्यात येतील.
Lake Ladki Yojna अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे
- अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार मुलगी केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळवत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराने एकाच वेळी दोन वेळा अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज केला जाईल.
*लेक लाडकी योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदार ला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात महिला व बालविकास विभागात जावे लागेल व लेख लाडकी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
- भरलेला अर्ज सदर कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची लेक लाडकी योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Lek Ladki Yojana 2024 online apply
*लेक लाडकी योजना ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम लेक लाडकी योजनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- होम पेजवर लेक लाडकी योजना वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये अर्जदारांनी विचारलेली सर्व माहिती सोबत जोडावी लागेल व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
अशाप्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Lek Ladki Yojana official website
एक लाडकी योजना Form PDF Download
येथे क्लिक करा
लेक लाडकी योजना शासन निर्णय
येथे क्लिक करा
Lek Ladki Yojana Gr PDF
येथे क्लिक करा
लेक लाडकी योजना फॉर्म मराठी
येथे क्लिक करा
लेख माझी लाडकी योजना Online Form
येथे क्लिक करा
FAQ
Lek Ladki Yojana Maharashtra 2024
राज्यातील मुलींना शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
लेक लाडकी योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
अशी कुटुंबीयांची आर्थिक दृष्ट्या घरी बसून त्यांच्या कुटुंबातील मुली आहेत.
लेक लाडकी योजनेअंतर्गत किती रुपयांची आर्थिक मदत केली जाईल?
या योजनेअंतर्गत एकूण एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
लेक लाडकी योजनेअंतर्गत ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता.
सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना जे उमेदवार या लेक लाडकी योजना या अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र असतील यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना
*जर कोणाला अडचण येत असेल अर्ज कसा भरायचा, कोठे भरायचा याची पूर्ण माहिती नसेल किंवा काही अडचणी येत असतील तर तुम्ही जवळच्या ऑनलाईन नेट कॅफे जेथे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म वगैरे भरत असतात .अशा कम्प्युटर सेंटरला भेट द्या किंवा आणखीन माहितीसाठी तुम्ही जवळच्या आधार सेंटरला जाऊन भेट द्या. धन्यवाद..